आता ‘या’ मंत्र्यावर ईडीची नजर?

मुंबई: भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. तशी यादी त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आणखी एका मंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यात सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे माध्यमांना दाखवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुश्रीफ यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारची टीम इलेव्हन जाहीर केली होती. यातील राखीव खेळाडूंची यादी वाढतच असून, त्यात आता आम्ही हसन मुश्रीफ यांचे नाव वाढवत असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

उद्या ईडीकडे अधिकृत तक्रार

एनसीपीच्या नेत्याचा घोटाळा काढला आता शिवसेनेचा नेत्याचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. तर उद्या अर्थातच 14 सप्टेंबरला ईडीकडे तक्रार करेल, तर तर दुसरीकडे दिल्लीत अर्थ मंत्रालयात ही सोमय्या हातात अधिकृत तक्रार करणार आहेत. तर नाविद मुश्रीफने देखील शेल कंपनीकडून कर्ज घेतले होते. असा देखील आरोप करण्यात आलाय.

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे म्हंटल. माझ्यावर बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले असून माझ्यावर असे आरोप होणार हे माहीत होतं असं हसन मुश्रीफ यांनी म्हंटल. खर तर सोमय्यांना काहीही माहिती नाही, त्यांनी कागल, कोल्हापूर ला येऊन माहिती घ्यावी असे खुलं आवाहन हसन मुश्रीफ यांनी दिले. किरीट सोमय्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share