देवरी पोलिसांची अवैद्य जुगार खेळणाऱ्यांवर धाड 1,88,030/- मुद्देमाल जप्त

देवरी 13: पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशानव्ये उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवून 12/09/2021 ला कारवाई करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा डोंगरगाव डेपो येथे शेतशिवारात 52 पत्त्याच्या तासपत्तीचा पैसा लावलेला जुगार काही इसम खेळात असल्याची माहिती मिळताच डोंगरगाव डेपो निवासी अनिल बाबुराव कुलभजे यांच्या शेतातील झोपडीत रेड घातली असता फळावर 1510रु , झडती घेतली असता 1500रु , 2 मोबाइल 15000/- , 4 मोटारसायकल 170000/- एकूण 1,88,030/- चा मुद्देमाल मिळून आला.

आरोपी नाव हेमंत तरोणे (43),आत्माराम शिवणकर (52), घनश्याम मेश्राम (45), अनिल कुलभजे (43), अशोक ढोमणे (41) रा बाह्मणी व एक इतर इसम असे 6 लोकांवर फिर्यादी पो ना रामचंद चौधरी ब नं 1606 पोलीस स्टे, देवरी यांच्या रिपोर्ट नुसार अपराध क्रं 226/2021 कलम 12 अ मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे , पोस्टाफ पोना परसमोडे ,पोना चौधरी ,पोशी डोहळे , पोशी धर्मे , पोशी नेवारे , पोशी बोपचे यांनी केली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें