नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दिले जागरूकतेचे धडे

देवरी 01: पोलिस अधीक्षक गोंदिया, विश्व पानसरे व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर कॅम्प देवरी,यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली,कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून तसेच ठाणेदार सपोनि. शरद पाटील , पो.उपनिरीक्षक इसकापे सा,पोलीस स्टेशन चिचगड यांचे सौजन्याने-दि- 01/09/021 रोजी अतिसंवेदनशील, नक्सलग्रस्त, भागातील शासकीय आश्रम कन्या शाळा बोरगाव/बाजार येथे “महिला बाल सुरक्षितता व समुपदेशक तसेच ग्रामीण भागातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल महिला वैद्यकीय अधिकारी,डॉ. स्नेहा अंबाते यांनी विद्यार्थ्यांनीना समुपदेशन व मार्गदर्शन केले व कोणत्याही संकटं समयी गोंदिया पोलीस विभाग आपले पाठिशी भक्कमपणे उभा आहे असे असा विश्वास दिला,तसेच गोंदिया पोलिस दलाकडून “माझी शाळा हरित शाळा” (Eco friendly school) पर्यावरण पूरक वातावरण तयार व्हावे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी व रासायनिक खतामुळे होणारे नुकसान भरमसाठ खर्च टाळून त्यांना कल्पकतेची जोड देत मिश्र शेती व इतर शेतीपूरक उद्योग यांना चालना देण्यासाठी शेंद्रिय खत प्रकल्प बसवण्यात आले व गोंदिया पोलिस दलाबद्दल सहानभूतीचे वातावरण निर्माण व्हावे, कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून शेंद्रिय खत प्रकल्प बसवला त्याचा वापर शाळेतील झाडे,नवीन प्लॅनटेशन याकरिता होणार आहे,यावेळी शाळेचे मुख्याध्यापक- भाकरे सर,दहिफळे सर,राऊत सर, व सर्व स्टाफ,पोलीस स्टेशन चिचगड चे सपोनि- शरद पाटील,महिला अंमलदार पठाण मॅडम, मेश्राम मॅडम, सहा. फौजदार. सोनजाल , यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक,भागातील सर्व पोलीस पाटील, विविध समित्या यांचे अध्यक्ष, व सचिव हजर होते, त्यांनी पोलिस विभागाचे या उपक्रमाबद्दल आभार मानले..

Share