देवरी: अवैद्य जुगार खेळणाऱ्या 6 लोकांवर धाड

देवरी 01: तासपत्तीवर अवैद्यरित्या जुगार खेळणाऱ्या 6 इसमांवर देवरी पोलिसांनी धाड टाकून 16500/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारावर देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांना शेडेपार गावात काही लोक 52 तासपत्तीचा हारजितीचा जुगार खेळात असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाणेदार सिंगनजुडे यांनी पोलीस स्टाफ सह सेडेपार गावातील पाण्याच्या टाकीजवळ काही लोक जुगार खेळत असल्याचे दिसून येताच धाड घातली असता फळावर 800/- आरोपीचे झडती घेतले असता 700/-, एक मोटार सायकल 15000/- असा 16500/- चा अवैध्य मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी -राजेश ढवळे (29), सोमचरण प्रधान (33), रवींद्र मडावी (30) कुंदन गावलकर (24) , अश्विन राऊत , शामा मडावी यांचेवर फिर्यादी मुकेश न्यायमूर्ती पो स्टे देवरी 1107 यांच्या तक्रारी नुसार अपराध क्रमांक 216/2021 कलम 12 अ मजुका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी पोलीस स्टेचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे , सपोनि आनंदराव घाडगे , पोह औरासे ,पो ना न्यायमूर्ती ,करंजेकर , परसमोडे , मस्के ,पोशी डोहळे यांनी केली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें