कोण होणार करोडपती’मध्ये भंडाऱ्याचे आकरे बनले लखपती

भंडारा : कोण होणार करोडपती सिजन पाचच्या कार्यक्रमात ‘ भंडारा जिल्ह्यातील लाखनीतील जयकृष्ण आकरे लखपती झाले आहेत.

jaykrushna akare

जयकृष्ण आकरे हे तालुका बिज गुणन प्रक्षेत्र पहेला येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांनी पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. परंतु, त्याच अभ्यासाच्या आधारे ते आज त्यांनी ही स्पर्धा जिंकली. ‘सोनी मराठी’वरील ‘कोण होणार करोडपती’ सीजन पाच या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी पहिल्या सिजनपासून नोंदणी करत होते. परंतु, त्यांना यंदा हॉट सिटवर बसण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम ३१ ऑगस्टला प्रसारित करण्यात आला. या स्पर्धेत त्यांनी अकरा प्रश्नांचे उत्तर देत सहा लाख चाळीस हजार रुपये जिंकले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडकर हे करतात. त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर सुद्धा आकरे यांनी चर्चा केली. जयकृष्ण यांच्या या कार्यक्रमातील सहभागामुळे जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम बघायची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. जयकृष्ण यांनी बक्षिस जिंकल्यामुळे कृषी विभाग जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.

मिळालेले बक्षीस मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार –

जयकृष्ण आकरे यांच्या परिवारात आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत. त्यांनी या स्पर्धेत जिंकलेले सहा लाख चाळीस हजार रुपये ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याचे सांगितले.

Share