देवरी तालुक्यातील लोहारा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न

शेतकऱ्यांनी आपले धान्य विक्रीसाठी शासकीय धान्य खरेदी केंद्रातच आणावे – आमदार सहषराम कोरोटे

लोहारा 20- उशिरा का होईना...! शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरातून होती अखेर आदिवासी विविध कार्यकारी संस्था लोहारा अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभ करण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. क्षेत्रातील सर्व प्रतीच्या धान पिकाची कापणी झाली असून अनेक ठिकाणी मळणीचे काम जोमाने सुरू आहे. दि.१९ नोव्हेंबर २०२० ला देवरी तालुक्यातील लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लोहारा र.नं.१३३१ च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ सहषराम कोरोटे आमदार देवरी-आमगाव विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भरतभाऊ दुधनांग संचालक आदिवासी विविध महामंडळ नाशिक, प्रमुख अतिथी म्हणून राजुभाऊ राऊत अध्यक्ष आदिवासी विविध कार्यकारी संस्था लोहारा, कृपासागर गोपाले उपाध्यक्ष, सरिताताई रहांगडाले माजी जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, दिपक पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, राकेश जी चांदेवार माजी सरपंच लोहार, अविनाश टेंभरे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वडेगांव, माजी अध्यक्ष लटये, पुरणभाऊ मटाले सामाजिक कार्यकर्ता, मेंढे तलाठी लोहारा, श्रीवास्तव गुरुजी लोहारा, शिरसागर जी पोलीस पाटील, गौतम मा. उपसरपंच लोहारा, संस्थेचे संचालक- व्यंकट भोयर, मानिक राऊत, तुकाराम धुर्वे, भोजराज उईके, कुवरलाल नाईक, धनलाल चुटे, दिलीप कांबळे, बुधराम डुंभरे, केशव कांबळे, सेवंताबाई चनाप, कुंताबाई राऊत, संस्थेचे सचिव रवींद्र नाईक, केंद्रप्रमुख संजयकुमार लांडे उपस्थित होते.
प्रस्ताविक राजू भाऊ राऊत अध्यक्ष आदिवासी विविध कार्यकारी संस्था लोहारा यांनी केले. धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी केंद्रावर येताना शासनाच्या निर्देशानुसार नियमाचे पालन करावे यावेळी बोलताना सांगितले. संचालन विलास चाकाटे तर आभार प्रदर्शन राकेश सोनवाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता चादेवार, हेमने, मडावी, नाईक व ग्रामस्थांनी सहकार्य केले. आधारभूत धान खरेदी केंद्र क्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share