सखी वन स्टॉप सेंटरची कौतुकास्पद कामगिरी

प्रतिनिधी/अक्षय बी.खोब्रागडे
भंडारा 19: भंडारा बस स्थानकाच्या आवारात एक अनामिक महिला वय अदांजे २६ वर्ष ही आपल्या ४ वर्षीय मुली सोबत बऱ्याच दिवसापासुन बेवारसपणे वास्तव्याला होती . तेथे तिला व तिच्या ४ वर्षीय मुलीला सुरक्षेच्यादृष्टीने अंत्यत धोकादायक असल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांव्दारे रूग्णालयात पोहोचवले जायचे परंतु ती तेथुन वांरवार पळुन जायची . नुकतेच भंडारा येथे पिडीत महिलांकरीता वन स्टॉप सेंटर सुरू झाले असल्यामुळे सदर महिलेला सुरक्षा मिळावी व तिला वैद्यकिय सहायता मिळुन तिचे जिवन सुकर व्हावे या हेतुने बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी श्री . साठवणे तसेच महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका मृणाल मुनेश्वर हे सदर पिडीत महिलेस तकिया रोड भंडारा येथे असलेल्या वन स्टॉप सेंटर येथे घेवुन आले . तेथिल . केंद्रप्रशासक कु . मनिषा -मोहुर्ले यांनी व त्यांच्या चमुने तिची आपुलकीने विचारपुस करून तिला आंघोळ घालुन , तिला व तिच्या मुलीला खाऊपिऊ घालुन , तिचे समुपदेशन केले . केंद्र प्रशासकाने स्वत : तिच्यागावी जावुन तिचे पुर्नवसन करण्याकरीता तिच्या कुटुंबियांशी चर्चा केली . तेव्हा असे कळले की , सदर महिलेच्या पतीचे काही वर्षापुर्वी निधन झालेले असुन त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिच्या सासुने तिला तिच्या मुलीसह घराबाहेर काढले त्यामुळे ती जवाहरनगर नॅ.हा. ६ वर असलेल्या पुलाच्या खाली वास्तव्याला होती . कालांतराने तिच्या मानसिकतेवर परिणाम झाल्यामुळे ती मुलीला सोबत घेवुन इतरत्र भटकु लागली . केंद्र प्रशासकाने तिच्या सासुशी संपर्क साधुन सदर पिडीतेला व तिच्या मुलीला आश्रय देण्याविषयी विनती केली परंतु तिने त्यास नकार दिला . त्यामुळे तिला ४ दिवस केंद्रात ठेवुन पुढील उपचाराकरीता सामान्य रूग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले . तेथिल वैद्य . अधि . डॉ . बांडबुचे यांनी सदर महिलेला नागपुर येथिल मनोरूग्णालयात दाखल करण्याची सुचना केली . डॉ . बांडेबुचे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .. यांच्या सहकार्याने पिडीत महिलेला कोर्टासमोर हजर करून मा . न्यायाधिशांकडुन तिला नागपुर येथे हलविण्याची परवानगी प्राप्त करून घेतली . पोलिस उपअधिक्षक श्री.काळसे साहेब तसेच पोलिस स्टेशन भंडाराचे पो.नि. श्री.कानसे साहेब यांनी सदर महिलेला सुरक्षितपणे नागपुरला नेता यावे या करीता केंद्रप्रशासकाच्या विंनतीवरून महिला पोलिस उपलब्ध करून दिले . जिल्हा शल्य चिकीत्सकांनी विनामुल्य अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली व सदर महिलेला उपचारार्थ मनोरूग्णालय नागपुर येथे दाखल करण्यात आले . तिच्या ४ वर्षिय मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशाने नागपुर येथिल श्रध्दानंद बालकाश्रमात ठेवण्यात आले . सदर कार्यवाही संस्थेचे संचालक श्री . विजय रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . व याकरीता जि.म.व बालविकासचे अधिकारी श्री . नंदागवळी व श्री . बांदुरकर तसेच वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Share