शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीची कारवाई

PraharTimes
वृत्तसंस्था / मुंबई :
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. भावना गवळी विदर्भातील शिवसेनेच्या नेत्या आहेत. आतापर्यंत त्या पाच वेळा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
२००६ चे प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभे करण्यात आले होते. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आला.
दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावन गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचे असे प्रकार आहे. केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला ५५ कोटींमध्ये आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त २५ लाख रुपये देऊन काबीज घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढेच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. मी ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत आहे.”, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

Print Friendly, PDF & Email
Share