?सावधान ! महामार्ग ओलांडतांना स्वतःची काळजी स्वतःचं घ्या ?

◾️शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांची वाढली चिंता

◾️राज्यातील अपघात २५ टक्क्यांनी वाढले

प्रहार टाईम्स |डॉ. सुजित टेटे
देवरी 30: राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातांसह त्यात मृत्यू पावणार्‍या प्रवाशांचा आकडा तब्बल 28 टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 6 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. जिल्हा अनलॉक होता बरोबर बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये सुरु झाली त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहरातुन मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या जळवाहनांमुळे येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

प्रामुख्याने बस स्टाप, चिचगड चौक, अग्रसेनचौक, पोस्टऑफ़िस, बैंक ओफ बदोडा, स्टेटबैंक, बैंक ओफ इंडिया कनेरा बैंक, पंचायतसमिती, तहसीलकार्यालय, शाळा महाविद्यालये , नगरपंचायत परिसरात सर्वात जास्त अनियंत्रित वाहतूतिचे चित्र बघावयास मिळते.

◾️बाजारपेठे, बँक, शासकीय कार्यालयात गर्दीमुळे रस्त्यावरील ट्राफिक वाढली :

जिल्हा अनलॉक होताच बाजारपेठ खुल्या झाल्या त्यामुळे ग्रामीण भागातील लोक तालुक्याच्या ठिकाणी कृषीविषयक साहित्य आणि जीवनोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी देवरी येथील बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. त्याच बरोबर महामार्गावरील वरदळ देखील वाढलेली असून बेजबाबदारपणे भर रस्त्यावर वाहने उभी केली जात असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.

बँक, पोस्ट ऑफिस , तहसील कार्यालये महामार्गावर असल्यामुळे याठिकाणी नेहमीच मोठीगर्दी असते. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या अपघातापासून जिव वाचविण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे.

◾️शालेय विद्यार्थी संकटात, पालकांची चिंता वाढली :

देवरी येथे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात शाळा, महाविद्यालये सुरु झालेले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये य दृष्टीने पालक आपल्या पाल्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठविण्यास उत्सुक आहेत. परंतु देवरी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रस्ता दुभाजकाला लागूनच मोठे जळ वाहने उभी केली जात असल्याचे स्पष्ट चित्र असून महामार्ग ओलांडताना येणारे जाणारे वाहन अजिबात दिसत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

महामार्ग ओलांडताना विद्यार्थी

राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई मध्ये झालेले असून अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू नाशिककरांचे झाले आहेत. परिणामी, राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अपघातांच्या संख्येत सुमारे 25 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

जानेवारी ते जून 2020 या काळात राज्यात एकूण 11 हजार 481 अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जून 2021 या काळात 14 हजार 245 पर्यंत वाढ झाली आहे. अपघातांच्या संख्यसोबतच त्यात मृत्यू पावणार्‍यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी एकूण 5 हजार 209 अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा 6 हजार 708 इकी वाढ झाली आहे. यंदा अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा 10 हजारांपार गेला आहे.

गेल्यावर्षी 9 हजार 641 प्रवासी अपघातांमध्ये जखमी झाले होते. यंदा त्यांची संख्या 10 हजार 879 इतकी झाली आहे. राज्यातील फक्त तीन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते. केवळ बुलढाणा, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना अपघातांची संख्या कमी करण्यात यश आले आहे.

बुलढाणामध्ये गेल्यावर्षी 233 अपघात झाले होते, त्यात यंदा 226 पर्यंत घट झाली आहे. त्यापाठोपाठ गतवर्षी ठाणे जिल्ह्यात 237 आणि पालघरमध्ये 326 अपघात झाले होते. यंदा मात्र दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे 174 आणि 232 इतकी घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, ही आकडेवारी कोरोन लॉकडाउन काळातही ठळकपणे समोर येताना दिसते.

◾️सर्वाधिक अपघात आणि मृत्यू…

आकडेवारीनुसार मुंबई : 956, नाशिक : 728, अहमदनगर : 675, पुणे : 674, कोल्हापूर : 514, सोलापूर : 453, नागपूर : 431, नागपूर (शहर) : 424, जळगाव : 418 आणि नांदेड : 396 हे 10 जिल्हा सर्वाधिक अपघात झालेले आहेत. त्याचवेळी नाशिक : 454, पुणे : 418, अहमदनगर : 367, जळगाव : 276, सोलापूर : 255, सातारा : 247, नागूपर (ग्रामीण) : 242, औरंगाबाद : 204, बीड : 197 आणि कोल्हापूर : 192 असे सर्वाधिक अपघाती मृत्यू होणारे 10 जिल्हे आहेत.

◾️या जिल्ह्यांत अपघाती मृत्यू घटले…

मुंबईसह पालघर, ठाणे, गडचिरोली, सांगली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अपघातात मृत्यू पावण्याचे प्रमाण कमी आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, सोलापूर (शहर) येथे अपघात जखमींची संख्या घटली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share