नगरपंचायत देवरीच्या क्रीडांगणावरील जिवंत विद्युत तारांवर स्पार्किंगमुळे भितीचे वातावरण
प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 28: तालुक्यात मागील महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यापासुन आज (28) ला दुपारी 1:30 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उष्णतेची दाहकता कमी झालेली असली तरी नगरपंचायत देवरीच्या क्रीडांगणावरील जिवंत विद्युत तारांवर पावसाचे पाणी पडल्यामुळे भर पावसात विद्युत स्पार्किंग होत असल्याचे लक्षात येताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रीडाप्रेमी , विद्यार्थी , इतर नागरिक या ठिकाणी दररोज भ्रमण करतात , खेळतात आणि सायंकाळी फिरायला निघतात त्यामुळे जिवंत तारांवर स्पार्किंग होत असल्यामुळे धोक्यांची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्युत तार बदलून घेऊन जबाबदारी पार पाडावी अशी मागणी क्रीडा प्रेमी करीत आहेत.
संबंधित घडलेल्या प्रकारचा विडिओ नगर पंचायत देवरी चे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना पाठविला असता त्यांनी महावितरणला संपर्क करून कळवितो. असे प्रहार टाईम्सला सांगितले.