अवैधरित्या सट्टापट्टी,जुगार खेळणाऱ्या 2 इसमावर देवरी पोलिसांची धडक कारवाई

◾️एकूण चार हजार तीनशे दोन रुपयाचा मुद्देमाल जप्त

देवरी 21: पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या कल्याण,मणिपुर ,राजधानी ,वरली मटका जुगार खेळणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस स्टेशन देवरी अंतर्गत दिनांक 20/8/2021 रोजी कारवाई करण्यात आली.

ठानेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी यांना मिळालेला गोपनीय माहिती च्या आधारे देवरी येथे नामे भोजराज रामदास बिंझाडे वय 45 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 2 देवरी हा आपले साईट सीट कवर दुकानात बसून अवैधरित्या मोबाईलवर कल्याण मणिपुर राजधानी वरली मटका जुगाराचे आकडे लिहून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने ठाणेदार सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनात पोलिस टॉपसह त्यांच्या सीट कव्हरचे दुकानात पंचांसमक्ष रेड घातली असता आरोपीचे अंगझडती मध्ये एक एम आय कंपनीचे मोबाईल किंमत 3000/- रुपये ,1300/- रुपये नगदी , कल्याण मणिपुर राजधानी वरली मटका जुगाराचे आकडे लिहिलेला कागदी चिटोरे , एक पेन किंमत 2/- रुपये असा एकूण चार हजार तीनशे दोन रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. आरोपी हा सदर जुगार , सट्टापट्टी ही नामे संतोष ठोंबरे राहणार कारगिल चौक देवरी यास त्याचे मोबाईल क्रमांक 8010239490 वर व्हॉट्सऍप द्वारे देत होता. भोजराज रामदास बिंझाडे 45 वर्ष राहणार देवरी व संतोष ठोंबरे राहणार कारगिल चौक देवरी यांच्यावर अपराध क्रमांक 201/2021 कलम 12 (अ)मजुका 109 भादंवि अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

सदर कारवाईमध्ये आरोपीकडून 4302/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे , पोलीस स्टेशन देवरीचे पोलीस स्टॉप , पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे ,पोलीस हवालदार पोलीस हवालदार चिरवतकर , पोलीस शिपाई शेंडे, पोलीस शिपाई रामराव कांदे , पोलीस शिपाई चव्हाण , मपोशि राठोड यांनी केली आहे.

Share