जाणून घ्या ,रोज गूळ-जिऱ्याचे पाणी पिल्याने होणारे फायदे

घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर हा उपाय जरुर करुन पाहा. डोकेदुखीशिवाय ताप असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.

जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.

जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या प्रत्येक समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज जिरे आणि गुळाचे पाणी घ्या.

पाठदुखी अथवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर यावरही जिरे आणि गुळाचे पाणी फायदेशीर असते. याशिवाय पिरियड्सदरम्यान हार्मोन्स बदलामुळे महिलांना त्रास होतो. यावरही गुळ आणि जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Share