आता मोबाईलमध्येच डाऊनलोड करा तुमचं आधार कार्ड….
सरकारी काम असो की खासगी आधार आवश्यक आहे. सिमकार्ड जरी खरेदी करायचे असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, या सर्व कामांसाठी आधार आवश्यक आहे. अलीकडेच UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता.
mAadhaar अॅपद्वारे युजर फोनवरच आधारसंबंधी सर्व माहीती अॅक्सेस करू शकतात. mAadhaar मुळे प्रत्येक वेळी प्रत्यक्षात आधार कॉपी बाळण्याची गरज पडणार नाही, तर mAadhaar app डाऊनलोड करुन तुमच्या मोबाईलमध्येच आधार कार्डची सॉफ्ट कॉपी ठेवता येते.
mAadhaar App कसं डाऊनलोड करणार?
▪️ mAadhaar Google Play Store आणि Apple App Store वरुन डाउनलोड करता येईल. mAadhaar UIDAI अॅप निवडा आणि इन्स्टॉल करा. mAadhaar ओपन केल्यानंतर एक फॉर्म दिसेल. त्यात पासवर्ड तयार करावा लागेल.
▪️ mAadhaar डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ? https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.mAadhaarPlus
▪️ आपल्या मोबाईलमध्ये mAadhaar app डाऊनलोड केल्यानंतर, तुमचं आधारचं प्रोफाईल या अॅपवर स्टोअर होईल. यात नोंदणी केलेला नंबर, नाव, पत्ता, लिंग, फोटो आणि इतर माहीती समाविष्ट असेल.
mAadhaar शी आधार नंबर लिंक करण्यासाठी..
सर्वात आधी आधार कार्ड स्कॅन करावं लागेल किंवा12 अंकी आधार नंबर टाकूनही तुम्ही लिंक करू शकाल. फक्त लक्षात राहुद्या की, इथे जो मोबाईल नंबर टाकाल, तो UIDAI शी लिंक केलेलाच नंबर असावा.
संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर Verify वर क्लिक करा. मग संपूर्ण माहीती तपासली जाते आणि यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP टाईप करून तिथे टाका.
mAadhaar ची वैशिष्ट्ये:
▪️ एनरोलमेंट सेंटरचं लोकेशन शोधता येते.
▪️ mAadhaar अॅपद्वारे आपण आपल्या फोनवर आधारची कॉपी डाऊनलोड करु शकता.
▪️ mAadhaar अॅपमध्ये Aadhaar री-प्रिंटचे ऑप्शन देखील आहे.
▪️ या अॅपमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय पत्ता देखील अपडेट करता येईल.
▪️ एक युजर एका फोनवर कुटुंबातील 5 व्यक्तींचे आधार या अॅपमध्ये ठेवू शकतो.
▪️ आधार लॉकिंग: बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टमचा वापर करून, आधार लॉक होईल आणि आपण तो अनलॉक करेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.
▪️ या अॅपद्वारे क्यूआर कोड आणि ई-केवायसी डेटा शेअर केला जाऊ शकतो.
▪️ या अॅपद्वारे रिक्वेस्ट स्टेटस चेक करता येईल व जवळच्या आधार नोंदणी केंद्राची माहिती मिळेल.