विमानातून पडलेल्या तरुणाच्या कुटुंबानं सांगितली मन सुन्न करणारी घटना म्हणाले,’त्याचे हात-पाय गायब होते…’

काबुल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेत आहेत. विमानतळावर गर्दी उमटली आहे. याचदरम्यान काबूल एयरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

काबूल विमानतळावरुन USAF’s च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केले . अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसूनच लँडिंग गिअर पकडून होते.

काबूलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले ३ अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचे या व्हिडियोत दिसत आहे. यात हवेतून खाली पडलेल्या व्यक्तीमध्ये १७ वर्षांचा रेझाही होता. आता रेझाच्या नातेवाईकांनी या हृदयद्रावक घटने बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

ते म्हणाले,’जेव्हा रेझाचा नातेवाईकांनी त्याला फोन केला त्यावेळी त्यांचा फोन एका अनोळखी व्यक्तीने उचलला त्यानंतर माहिती झाले की रेझा सोबत काही अघटित घडले आहे.  याबाबत त्यांना  सविस्तर माहिती मिळाली की,’रेझासोबत त्याचा भाऊदेखील काबुल विमानतळावर गेला होता. त्यांना अफगाणिस्थान सोडायचे होते. या साठी तो विमानतळाजवळ गेला होता.’

ज्यावेळी हि घटना घडली त्यानंतर काही तासात आम्हाला याबाबत कळले. जेव्हा त्याचा मृतदेह आम्हाला मिळाला तेव्हा त्याचे हात-पाय गायब होते. आमच्याच कुटूंबियातील आणखी तीन व्यक्ती गायब आहे.’ अशा शब्दांत रेझाच्या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली. विमानाने उड्डाण केल्यानंतर या विमानाच्या इंजिनावर चढलेल्या लोकांचा धक्कादायक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर एकच झुंबड उडाली होती.

Print Friendly, PDF & Email
Share