एम.बी.पटेल महाविद्यालयात ‘निनाद’ वार्षिकांकाचे प्रकाशन
प्रहार टाईम्स| भुपेन्द्र मस्के
देवरी:गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला ,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय देवरी दरवर्षी वार्षिकांक प्रकाशित करते.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 2020 – 21 चा अंक ‘कोरोनाशी झुंज देतांना’या मथळ्याखाली करण्यात आला.प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांच्या मार्गदर्शनात ,निनाद च्या संपादिका सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.वर्षा गंगणे यांनी अंकाचे उत्कृष्ट संपादन केले.विद्यार्थ्याना लेखन कला अवगत व्हावी तसेच त्यांना त्यांच्या भावनांना वाट मोकळी करण्याची संधी लाभावी म्हणून संपादिका सातत्याने प्रयत्नरत असतात.
निनाद चा प्रकाशन सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.यावेळी डॉ.अरुण झिंगरे,डॉ.देवेन्द्र बिसेन, डॉ.वर्षा गंगणे,डॉ.जयपाल चव्हाण डॉ.अभिनंदन पाखमोडे, डॉ.सुधीर भांडारकर तसेच ग्रंथपाल डॉ.चंद्रमणी गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुनील खलोदे,गायत्री गुप्ता,वंदना लाखडे ,मंजित निर्वाण,प्रवीण गुरुमार्गी यांनी अथक प्रयत्न केले.अतिशय समर्पक मुखपृष्ठ असलेले तसेच अभ्यासपूर्ण माहितीने परिपूर्ण असलेला हा विशेशांक अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.