“एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत“ गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे अभिनव उपक्रम
डॉ. सुजित टेटे
गोंदिया १५: भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार हा सण मोठया उत्साहाने साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पुर्ण करतात. समाजाला मुलभुत सुविधांची गरज असतांनाच प्रेमाची आवश्यकता आहे.
याबाबी कडून लक्ष देत आदिवासी नागरीक व त्यांच्या मुलांना मदत मिळावी या करीता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त आदिवासी भागात गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फ ‘एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत’ हा उपक्रम चालविण्यात येत आहे.
सदर एक दिवाळी आदिवासी बांधबांसोबत या उपक्रमामध्ये गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम भागातील ६२ गावापेकी आतापर्यंत ४८ गावांमध्ये दिवाळीची भेट म्हणन एकुण २००५ साडया , २००५ बलांंकेट , ७७५ टी शर्ट , २५० धोतर , ७५० टिफीन , २००० मास्क , ५० व्हॉलीबॉल किट , १९८ क्रिकेट किट , २००० चप्पल/ जूते , ५० फुटबॉल किट, ७०० स्कूल बॅग , ९५० स्टील ग्लास , ६५० पानी बॉटल , २०१० मिठाई बॉक्स, फरसान इत्यादी जिवनावश्यक वस्तु व मुलांना शालेय व खेळाचे साहित्य इत्यादी वस्तु वाटप करण्यात आले.
दिनांक 13 आणि 14/11/20 रोजी पोलीस स्टेशन देवरी, चिचगड, सालेकसा, केशोरी, नवेगांवबांध, डूग्गीपार अंतर्गत मोजा मंगेझरी, राजनडोंगरी, जपकसा, लेंडीजोब, सोरीटोला , रामगड सुकळी करुझरो, महाजनटोला (पिपरखारी) , म्हैसुली, महाजनटोला, मडावीटोला, बिचटोला, चिचटोला, पंधरेटोला, टेभुटोला , मानागड ,पथराटोला, डुंबरटोला, डहाराटोला, मरामजोंब, भर्रीटोला मुरकुटडोह क्र. १,२, ३, टेकाटोला, दंडारी आंबाटोला, असिमनगर, पिपरीया, बाकलसरां, कोहकाटोला, निमटोला, गल्लाटोला, इंडुकचुबा, तिरखुरी नागनडोह, खडकी १, २, डमरपायली, बल्लीटोला, शिवरामटोला, गंधारी, जांभळो, येरंडी/दरं, जब्बारखेडा, चुटीवा, मोगरां, मोगरं टोला या गावातील २००५ अदिवासी गरीब व गरजु कु्टूंबीयांना दिवाळीची भेट म्हणुन ब्लांकेट, धोतर, साडी, टी शर्ट टिफीन, मास्क, व्हॉलोबॉल किट , क्रिकेट किट , चप्पल/ जुते , फुटबॉल किट , स्कुल बँग, स्टील ग्लास, पानी बॉटल, फरसान,।मिठाई व मुलांना शालेय व खेळाचे साहित्य इत्यादी वस्तु बाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी-अपर पोलीस अधीक्षक
गोंदिया कॅम्प देवरी, जालींदर नालकुल- उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव/देवरी, नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व सशस्त्र दुरक्षेत्र प्रभारी अधिकारी, सर्व सी-६० पथक प्रभारी अधिकारी, सर्व नक्षल ऑपरेशन सेल, प्रोपोगंडा सेल , विशेष कृती दल येथील अधिकारी व अमंलदार तसेच सदर गावातील नागरीक, सरपंच, पोलीस पाटील, विद्यार्थी उपस्थित होते।
एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे, अपर पोलीस
अधीक्षक गोंदिया अतुल कुलकर्णी, यांचे संकल्पनेतुन गोंदिया जिल्हयात राबविण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता गोंदिया जिल्हयातील दानशुर व्यक्तीनी आदिवासी बाँधवाना जीवनावश्यक वस्तु पुरबिण्याकरीता मोलाची साथ दिली, तसेच गोंदिया जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अमंलदार , सर्व सशस्त्र दूरक्षेत्र येथील अधिकारी व अमलदार तसेच सी-६० पथकातील अधिकारी व अमंलदार , सर्व नक्षल ऑपरेशन सेल, प्रोपोगंडा सेल , विशेष कृती दल येथील अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून व्यवस्थीतपणे पार पाडले. श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया केम्प देवरी यांनी गोंदिया जिल्हयातील इतर दानशुर व्यक्तींचे तसेच गॉंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी/ अमलदार यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.