बिलारगोंदी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

डॉ. सुजित टेटे

देवरी १५: भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या पर्वावर भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्राचार्य घनश्याम निखाडे वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली,नथुजी चकाटे सामाजिक कार्यकर्ता, सुखलाल जमदाळ वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून उपस्थित होते,उत्तमजी लांजेवार ग्रामपंचायत सदस्य शेडेपार , उदराम हटवार, हेमराज नाईक, किशोर कुंजाम, अरुण जमदळ, रामकुमार मडावी महाराष्ट्र पोलीस, ओमराज चाकटे,शंभुजी राऊत,जियालाल गाते, सोमजी जमदल, अरपाल जमदाल, हेमराज नाईक,संजय चाकते, राजेंद्र राऊत, किशोर कुंजम, उमेश राऊत, मुकेश जमदाल, तुळशीराम जामदल,किशोर जमदाळ, राजकुमार मडावी , घनश्याम कुंजाम, खुशाल कुरसूंगे, कैलास चकाटे, हेमकृष्न लांजेवार, अविनाश जमदाळ, देवराज नाईक, तिलक कुरसुंगे ,सुनील जमदाळ व गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
त्याप्रसंगी उद्घाटनिय भाषणामध्ये प्राचार्य घनश्याम निखाडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व दरवर्षी समाजाने एकजूट होऊन मोठ्या संख्येने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करावी व सर्व समाज बांधवांनी उच्च शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही असे त्या वेळी सांगितले. त्याचबरोबर इंजी. किशोर कुंजाम यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये भगवान बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली, व कार्यक्रमाची आखणी वर भर दिला . प्रमुख अतिथी म्हणून नथुजी चाकाटे यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणांमधून सूखलाल जमदाळ यांनी एकजुटीने दरवर्षी जयंती चा कार्यक्रम मोठ्या थाटाने पार पाडू असे सर्वांना सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इंजि. राजेंद्र राऊत यांनी केले.

Share