आता व्हॉट्सॲपवर मिळवता येईल कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

वृत्तसंस्था / मुंबई : आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर कोरोना लसीचे प्रमाणपत्र काही मिनिटांत सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवर मिळालेले कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जतन करू शकता.

प्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा, मग व्हॉट्सॲप चॅट उघडा आणि कोविड प्रमाणपत्र (covid certificate) टाइप करा.
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल (येथे नमूद करणे महत्वाचे आहे की हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल.) हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सॲप उघडा. चॅट बॉक्स वर जा आणि covid प्रमाणपत्र टाइप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल.
हा OTP व्हॉट्सॲप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.

Print Friendly, PDF & Email
Share