लाखनी शहरातील बाजार पेठेतील गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी

प्रतिनिधी/पवन के.निरगुळे

लाखनी 13: महाराष्ट्र शासन व मा. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशान्वये लाखणी शहरातील दर मंगळवारी भरणारे आठवडी बाजार ३ नोव्हेंबर पासून पूर्वीच्या ठिकाणी शासनाच्या गर्दी अटीच्या अधीन राहून सुरु करण्याचे परवानगी देण्यात आले. त्याच बरोबर मोटरसायकल तसेच चार चाकी वाहनांना पार्किंगसाठी व्यवस्था करून देण्यात आली. पार्किंगची व्यवस्था ही जुन्या गंज सुलभ शौचालय जवळ व नगरपंचायत दुकान मागे पटांगणात केलेले आहे .परंतु सिंधी लाईन येथे नो पार्किंग झोन दिले असता, नागरिक रोडच्या कडेला गाड्या उभे करतात व आपली शॉपिंग करतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना जागेची कमतरता पडते.त्यामुळे नगरपरिषदेने लावलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. आणि नगर परिषदेने दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांवर ५०० रुपये तसेच वाहनधारकांवर १०० रुपये दंड करण्यात आले आहे. परंतु या सर्व नियमांचे तसेच शासनाने दिलेले नियमांच्या पालन केले जात नाही. या सर्व बाबींकडे लाखणी नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share