केनेरा बँक अधिकारी असोसिएशनचा मदतीचा हात

एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत’ या उपक्रमात अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सुफुर्त केली मदत

देवरी 13- केंनेरा बँक अधिकारी असोसीएशनच्या वतीने गोंदिया पोलिस दलातर्फे आयोजित ‘एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत’ या उपक्रमामध्ये मदतीचा हात दाखवीत बँकिंग क्षेत्रातून महत्वाचा संदेश दिला आहे.

“आदिवासी बांधवांच्या दिवाळीचा एक भाग बनून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन खरी दिवाळी साजरी केली असे वाटते” – विवेक पटले ( सहायक व्यवस्थापक केंनेरा बँक देवरी )

“देणार्‍याने देत जावे , घेणार्‍याने घेत जावे” या ओळीची आठवण यावेळी झाली असून. या उपक्रमामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , केंनेरा बँक देवरीचे सहाय्यक व्यवस्थापक विवेक पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि असोसिएशनच्या क्षेत्रीय डीजीएस देवरम छप्परघरे , प्रशांत निनावे , उदय खरडनविश यांच्या मार्गदर्शनात मदत पोहचविली गेली.

आदिवासी बांधव दिवाळी सण आपल्या तूटपुंज्या उत्पन्नातून साजरा करीत असतात परंतु यावेळी आलेल्या जागतिक संकटमुळे त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने या संकल्पनेच्या माध्यमातून मदत करण्याचे मानस मनात बाळगून आयपीएस अतुल कुलकर्णी यांनी एक सामाजिक संदेश देत माणुसकी जपली आणि आदिवासींच्या दिवाळीचा एक भाग बनून त्यांच्या आनंदाचा एक भाग होऊन आनंदाचा वर्षाव करून दाखविला.

या मदतीमध्ये 40 टीशर्ट , 20 साळया , 17 दर्‍या , 14 ब्लंकेट्स , 10 सोलापुरी चादरी या वस्तूचा समावेश होता. सदर भेटवस्तू देतेवेळी नितिन मेश्राम , विष्णुप्रशाद अग्रवाल मतीन पठाण , हिरमान पोहनकर, केंनेरा बँक देवरीचे अवनीष कुमार झा , आशीष खुने , सुनील पराठे , आशीष थोटे उपस्थित होते.

Share