शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून लांबणीवर टाकली गेलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET exam) अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा राज्यात 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षक (Teacher) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी शिक्षकांना या परीक्षेसाठी तब्बल 2 महिन्याहून जास्त वेळ भेटणार आहे. (TET timetable)

राज्यभरात टीईटीची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने घेण्यात येणार असून शिक्षक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज (Online Apply For TET) करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आदी शाळांमध्ये लवकरच 6 हजार 100 नवीन शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

राज्यात 2019 नंतर टीईटीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही परीक्षा आयोजित करून नवीन तरुण उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.

टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक:

▪️ ऑनलाइन अर्ज 3 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान करावयाचा आहे.

▪️प्रवेशपत्र (Hall Ticket) 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

▪️ टीईटी पेपर 1 : 10 ऑक्‍टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजता होईल.

▪️ टीईटी पेपर 2 : 10 ऑक्‍टोबर, दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत असेल.

Print Friendly, PDF & Email
Share