शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल कच्छवे यांची बदली अमरावतीला
गोंदिया 31: दि. 31.05.2021 रोजी पदस्थापनेच्या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळ क्र.1 समोर सादर करण्यात आला होता. त्यानुसार सध्याचे गोंदिया जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कच्छवे यांची बदली शिक्षणाधिकारी (माध्य.) म्हणून अमरावती येथे झाली असल्याने गोंदिया जिल्यातील शिक्षणाधिकारी (माध्य.) या रिक्त झालेल्या जागेवर नागपूर विभागीय मंडळ, जि.नागपूर येथील विभागीय सहसचिव माधुरी सावरकर, यांची बदली करण्यात आलेली आहे. शिक्षक भारती गोंदिया द्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








