“आरटीई” प्रवेशासाठी दि.31 जुलैपर्यंत मुदतवाढ
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवर राज्यातील शाळांमध्ये 56 हजार 822 बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्यापही प्रवेशाच्या बऱ्याचशा जागा रिक्तच आहेत. यामुळे प्रवेशासाठी आता पुन्हा 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
“आरटीई’ प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 432 शाळांमध्ये 96 हजार 684 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 22 हजार 584 बालकांचे अर्ज पालकांनी ऑनलाइन दाखल केले होते. यातील 82 हजार 129 बालकांना प्रवेशाच्या लॉटरीत नंबर लागला आहे. लॉटरी लागलेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया 11 जूनपासून सुरू करण्यात आलेली आहे.