आमदार सहसराम कोरोटे यांचे हस्ते बोरगाव येथे खावटी किट वितरण कार्यक्रम

भुपेन्द्र मस्के

 देवरी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी आयोजित खावटी अनुदान  योजना 2020-21  अंतर्गत खावटी कीट वितरण  पात्र लाभार्थ्यांना एकलव्य बोरगाव बाजार येथे आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र व भरतसिंग दुधनांग संचालक आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन  अनमोल सागर (भा.प्र.से)प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी व आश्रमशाळा बोरगाव बा. मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

 या  प्रसंगी एच. ए. सरयाम सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प देवरी , कल्पनाताई देशमुख सरपंच बोरगाव बा. , काशिबाई कुंजाम उपसरपंच , कैलासभाऊ देशमुख सदस्य , कुलदिपजी गुप्ता,एकलव्य प्राचार्य संजय बोनतावार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लाभार्थी  उपस्थित होते.

लॉक डाऊन नियमाचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून केवळ 12 लाभार्थी बोलावून कार्यक्रम आयोजित करण्यात आला . आमदार कोरोटे  यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले कि इस. सं 1978 मध्ये सुरू झालेली खावटी कर्ज योजना 2013 पर्यन्त चालली परंतु 2013 पासून सदर योजना बंद करण्यात आली होती.  माझ्यासह इतर लोकप्रतिनिधींनी  शासनाकडे वारंवार मागणी लावून धरली व कोरोनाचे भिषन संकटात आमच्या महाआघाडी सरकारने त्याची दखल घेतली व दि. 09 सप्टेंबर 2020 ला शासन निर्णय काढून खावटी अनुदान  योजना 2020-21 मंजूर केली. त्यांना  बोरगाव येथे दोन्ही शाळेमिळून 1000 विद्यार्थी व लोकसंख्या 2000 असतांना आरोग्य सेवा नसल्याचे मुख्याध्यापक भाकरे यांनी सांगितल्यावर लगेच सरपंच यांना ठराव व प्रस्ताव तयार करून पाठवा असे सांगून सदर बाबतीत मी मागणी शासनाकडे करण्याचे आश्वासन दिले.  दूधनांग यांनी यांनी खावटी किट ऐवजी संपूर्ण रु. 4000 बँकेत जमा कण्याविषयी आपले मत मांडले. अनमोल सागर, प्रकल्प अधिकारी यांनी मी दिल्लीचा असून अनेक बाबी माझ्यासाठी पहिल्यांदा होत असून प्रकल्पाचा विकास करण्याकरिता मी 24 तास उपलब्ध असेल व माझ्या  वैयक्तिक भ्रमणध्वनीवर केव्हाही आपली समस्या मांडा मी तत्पर असेल अशी  ग्वाही दिली. दोन्ही शाळेच्या पाणी व शिक्षक समस्या तात्काळ सोडवणार असल्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये नरेंद्र भाकरे यांनी शासनाने महाराष्ट्रातील 11 लक्ष 55 हजार आदिवासी लाभार्थी त्यापैकी मनरेगा 4 लक्ष , आदिम जमाती 2.26 लक्ष पारधी जमातीची 64 हजार वनहक्क धारक 1.65 लक्ष व जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी निक्षित केलेली परितकत्या ,विधवा व घंटस्फोटीत महिला ,अपंग ,भूमिहीन शेतमजूर यांचे 3 लक्ष  लाभार्थी निवडण्याचे ठरविण्यात आले होते . एकूण 11 लक्ष 50 हजार कुटुंबांना 4000 रु. प्रमाणे 462 कोटी व इतर खर्चा करिता 24 कोटी असा  एकूण 486 कोटी निधी वरील शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 2000 रु. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट  वितरित करण्यात आले. उर्वरित 2000 रु. वस्तुस्वरूपात खावटी किट स्वरूपात देण्यात येत आहे.गोंदिया जिल्हयाकरिता एकूण  अशी माहिती दिली. 

सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता एच. ए. सरयाम सहाय्यक प्रकल्प अधिकारी व श्री. शिवाजी तोरकड प्रकल्प कार्यालय देवरी यांनी यांनी भूमिका बजावली.संचालन बारसागडे तर आभारप्रदर्शन सरयाम यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share