कुजलेल्या धाना मुळे नागरिक त्रस्त

चिचगड-19 चिचगड येथे असलेल्या आदिवासी सोसायटी मधील धान उचलण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे आणि ऐन पावसाळ्यात धान उचलणे सुरू केल्यामुळे कित्येक धान पावसामुळे भिजला आणि सडला त्या सडल्या ध्यानामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्याचा वास इतका उग्र आहे की त्या परिसरातून जाणे-येणे कठीण झालेले आहे व विशेष म्हणजे त्या परिसरात लोकवस्ती पण आहे आणि मेन चौकामध्ये आदिवासी सोसायटी असल्यामुळे इथून जाणे-येणे करावेच लागते पन सडलेल्या धानाच्या वासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
तरीपण संबंधित विभागाने आदिवासी सोसायटीमधील सडलेल्या धानाची बाहेर नेऊन विल्हेवाट लावावी अशी मागणी चिचगड आणि परिसरात नागरिकांनी केली आहे

Share