पंढरपुरात दाखल होण्यासाठी मुख्यमंत्री स्वतःच चालवत आहेत गाडी; शासकीय पूजेसाठी राहणार हजर

मुंबई– आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पंढरपूरला हजर राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबासमवेत पंढरपूर कडे रवाना झाले आहेत. ते रात्री सात ते आठच्या सुमारास पंढरपूरात दाखल होणार अशी माहिती सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

पूजेसाठी सर्व कुटुंब हजर राहणार
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित राहतील. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे

Share