भूमिहीन शेतकऱ्यांच्या अतिक्रमण जागेवरिल पिकाची नासधुस करुण अतिक्रमण काढण्याची कारवाई
देवरी, ता.18: ऐकिकडे शासन वनहक्क समिती मार्फत अतिक्रमण केलेल्या सर्व लोकांना जागेचे पट्टे वितरित करीत आहे. तर दूसरी कड़े देवरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी एका भूमिहीन शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी शेतात रोवलेले पिकावर ट्रेक्टर चालवून पिकाची नासधुस करुण अतिक्रमण काढण्याचा प्रकार देवरी तालुक्यातील गडेगाव येथील नीलेश सुखदेव साखरे यांच्या विरुद्ध गुरुवार(ता.१५ जुलै) रोजी केलेल्या कारवाई मुळे उघडिस आले आहे.
सविस्तर असे की, गडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नीलेश सुखदेव साखरे यांनी २००४-५ या वर्षापासून गावालगत असलेल्या भू.क्र.३१२ क्षेत्र १०४-६२ या गटावर अतिक्रमण करुण शेती बांधली परंतु काही कारणास्व मागील दोन वर्षापासून या अतिक्रमण केलेल्या शेतजमिनीचा दावा सादर करू शकले नाही. तसेच मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गकाळ असल्यामुळे ग्रामसभा सुद्धा घेण्यात आली नाही.
ज्यामुळे मागील दोन वर्षापासून देवरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी या अतिक्रमण शेतातील जागेवर रोवलेल्या उभ्या पिकांवर ट्रेक्टर चालवून पिकाची नासधुस करुण अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे नीलेश साखरे यांच्यावर आर्थिक भुंदर्ड बसत आहे.
तरी शासनाने या अतिक्रमण केलेल्या शेत जमीन कसन्याची परवानगी द्यावी तसेच वनविभाग देवरी कडून कशल्याच प्रकारची कारवाई करू नये या मागणी संदर्भात एक निवेदन नीलेश साखरे यांनी देवरी चे उपविभागीय अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना शुक्रवारी (ता.१६ जुलै) रोजी सादर केले आहे.