नवीन राशनकार्ड व प्राधान्य कुटुंबातील गरजु लोकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळावा

ककोडी येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत शिबीर चे आयोजन

देवरी,ता.18:शासनाच्या वतीने गरीब व गरजु लोकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळावा या उद्देशाने राज्य स्तरावर प्रत्येक तहसील कार्यालय अंतर्गत महाराजस्व अभियान राबवून या द्वारे नवीन राशन कार्ड बनविने, राशन कार्डची दुरुस्ती व गरीब-गरजु लोकांना प्राधान्य कुटुंबात समावेश करुण त्यांना धान्य वाटप करने असे या अभियाणाचे उद्देश्य आहे. या करिता ककोडी येथे तहसील कार्यालय मार्फत या शिबिराच्या माध्यमातून नवीन राशन कार्ड व प्राधान्य कुटुम्ब योजनेतून बनवीणाऱ्या राशन कार्डतुन जास्तीत जास्त लोकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते ककोडी येथे तहसील कार्यालय मार्फत महाराजस्व अभियान अंतर्गत मंगळवार(ता.१३ जुलै) रोजी शिबीर चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
यावेळी ककोडी, चिल्हाटी, मुरमाड़ी, उचेपुर, महाका,जपकसा, वडेकसा, धवलखेळी, गोठानपार येथील गरजु लाभार्थ्यांना नवीन राशनकार्ड, कार्डवरील नाव कमी व समाविष्ठ करने, नावात दुरुस्ती, दुय्यम राशन कार्ड तैयार करुण पात्र असलेले प्राधान्य कुटुंबातील राशन कार्ड तैयार करन्यात आले तसेच नवीन कार्ड करिता लागणार कागड़पत्र ही स्विकारण्यात आले.
या प्रसंगी देवरी तहसील चे नायब तहसीलदार श्री. यावलकर ककोडी चे सरपंच मिनाताई मडावी, उपसरपंच भैयालाल जाम्भूळकर, ग्रा.पं. चे सचिव आर.बी.अम्बादे, चिल्हाटीचे सरपंच पुस्तकला मडावी, ककोडी ग्रा.पं.सदस्य रियाज खान, विनोद सुरसावंत, शामकला कपुरडेरिया, मनीष धरमगुळे, हरसिला जाम्भूळकर, कु.हिमानी काशिम, सामाजिक कार्यकर्ता, बबलु भाटिया, नरेंद्र शांडिल , अमरदास सोनबोइर, घनश्याम मडावी व मनीष मोटधरे यांच्या सह ककोडी परिसरातील अनेक गावातील लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share