ब्लॉसम स्कूलची सिद्धि थोटे (99%) देवरी तालुक्यातून प्रथम
देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूलचे 7 विद्यार्थ्यांनी मारली 90च्या वर भरारी
देवरी 17- येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक येथील एस.एस.सी.परीक्षा -2021करिता विद्यालयातून एकूण 14 विद्यार्थ्यांची मूल्यमापनासाठी नोंदणी करण्यात आली होती. कोविड-19 मुळे सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार इयत्ता 10वी चा निकाल नागपूर बोर्डाद्वारे घोषित करण्यात आला .त्यानुसार सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 100 टक्के आहे.
यामध्ये कु. सिद्धी थोटे हिने 99 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक , कु. अमिषा मोहरकर हिने 96.60 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, कु. विदिशा अग्रवाल हिने 96.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
- दीपक रत्नाकर – 95%
- गुंजन भांडारकर -94.80%
- प्रणिपात पराते -92.20%
- तनुजा रत्नाकर – 91.40%
- सोहिल चौधरी – 88.80%
- विशाल कोल्हे -87.80 %
- सुमेधा सातदेवे -75.40%
- दक्ष गवते -74.60%
- स्नेहल गाते – 69.60%
- अर्चिता मोटघरे -65%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , हर्षदा चारमोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
याचप्रमाणे कल्पवृक्ष शिक्षण संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल , अध्यक्षा अंकिता अग्रवाल तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.