गोंदिया जिल्ह्यात आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम भागात पुन्हा गजबजल्या शाळा

142 शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीची हिरवी झेंडी
गोंदिया जिल्ह्यात अखेर शाळांची घंटी वाजली
जिल्ह्यात 8 ते 12 वी चे 142 शाळा आजपासून सुरू

गोंदिया 15: जिल्ह्यात आज राज्यशासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत यांच्या परवानगीने ठराव घेत 8 ते 12 वी चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली त्यानुसार आज जिल्ह्यातील 372 शाळापैकी 142 शाळांचे ठराव शिक्षण विभागाला प्राप्त झाले त्यानुसार 142 शाळा ह्या जिल्ह्यात सुरू झाल्या असून विध्यार्ध्यांकडून हमीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला। ज्यात खाजगी आणि जिल्हापरिषदच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे। शाळेत येण्याऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वार सॅनिटायझर, थर्मलचेकिंग , मास्क , ऑक्सिजन लेवल ,प्लस रेट तपासुन शाळेत प्रवेश देण्यात आला। तसेच सूचना फलकांचे काळजीपूर्वक वाचन करण्यास सांगण्यात आले यावेळी मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसुन आला.

गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२वीच्या ३७२ शाळांपैकी १४२ शाळा सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्यामुळे या शाळांपैकी काही शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.नक्सलग्रस्त आणि देवरी,सालेकसा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 8 ते 12 पर्यतच्या शाळा कोरोनाच्या सावटात पुन्हा स्कूल चले हमच्या नार्यासह विद्यार्थ्यांच्या किलबिटासह सूरू झाल्याआहेत. गोंदिया जिल्ह्यातील शाळा,कॉलेज हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या मात्र आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा कॉलेज सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे त्यामुळे आता शाळा ,कॉलेज पुन्हा बहरले आहेत.

Share