आज 1 वाजता 10 वी चा निकाल कसा बघाल..!

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला 10 वीच्या परीक्षेचा निकाल आज 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे 10 वीतील विद्यार्थ्यांचे निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. म्हणून राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.

असा पहा निकाल –

> मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र 10 वीच्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

http://result.mh-ssc.ac.in

> आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

> आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.

> आपला SSC निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

> संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या परीक्षा नंबर माहित नसल्याने निकाल पाहत असताना विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून बोर्डाने यावर्षी खास सोय केली आहे

विद्यार्थ्याचे नाव
आईचे नाव
जन्मतारीख

इत्यादी माहिती भरल्यावर विद्यार्थ्याला त्याचा परीक्षा नंबर माहित होणार आहे आणि त्या परीक्षा नंबर नुसार निकाल समजणार आहे.

Share