जि प सावली मॉडेल शाळेच्या प्रांगणामध्ये केले वृक्षारोपण

डॉ.सुजित टेटे

देवरी 14 : सावली येथील जिल्हा परिषद मॉडेल शाळेच्या भव्य पटांगणामध्ये आंबा जांभूळ अशोक कडुलिंब आवळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणाच्या प्रसंगी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी खालील प्रकारे झाडाचे महत्व समजावून दिले.

जगावर कोरोना महामारीचे संकट आलेले आहे या महामारी मुळे संपूर्ण मानव जात संकटात सापडलेली आहे. कोरोना कधी संपेल व बंदिस्त झालेले मानवी जीवन कधी मोकळे होईल हे आज तरी निश्चित सांगणे कठीण आहे. झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे सावली गाव चहूबाजूने झाडांनी वेढलेला असून त्यामध्ये अधिक भर घालावी त्यामुळे आपले जीवन सुरक्षित होईल.

या महामारी मध्ये माणसाकडे असलेले धनसंपत्ती नातीगोती काहीही कामाला आले नाही. अक्षरशः लाखो लोकांचा बळी या महामारी मुळे गेलेला आहे. हे संकट जरी मानवनिर्मित असले तरी यामधून माणसाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. या संकटा मागे दुसरे तिसरे काही कारण नसून माणसाचा स्वार्थ पूर्णपणे दडलेला आहे.

सर्वांना माहीत आहेकी अक्षरशः एका ऑक्सिजनच्या सिलेंडर साठी हजारो रुपये मोजावे लागले आहेत. जी झाडे आपणास जन्मापासून मृत्यूपर्यंत अगदी फुकट मध्ये ऑक्सिजन देतात फळे फुले देतात सावली देतात माणूस सगळे हे झाडांचे उपकार विसरलेला आहे. त्यामुळे सर्व जगभर भारतामध्ये झाडांची अमानुषपणे कत्तल केली जात आहे. जेव्हा लाखो रुपये घेऊन जीव वाचवण्यासाठी माणूस कुणी हवा देता का हवा असे म्हणून फिरू लागला परंतु त्याला ऑक्सीजन भेटला नाही त्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. त्याने फुकटमध्ये ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची किंमत ओळखली नाही. तो हे विसरला की झाडा मुळेच आपले जीवन आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला अक्षरशः ओरबाडण्याचे काम केलेले आहे. त्याची किंमत माणूस आज मोजत आहे. असेच जर भविष्यामध्ये ही होत राहिली तर पृथ्वीचा विनाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणून मानवाने आता सावध होण्याची वेळ आलेली आहे.

यावेळी रामेश्वर पवार अध्यक्ष श.व्य.स. झुलन बाई पंधरे सरपंच राजेश्वरी बिजलिकर उपसरपंच प्रभू दयाल पवार माजी सरपंच यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाची स्तुती करत भविष्यामध्ये अशा समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आपण स्वतः सहयोग करणार असल्याचे सांगितले. तसेच मानवी जीवन टिकवायचे असेल तर झाडे लावणे व ती काळजीपूर्वक जगवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या संबोधनात म्हटले झाडे लावणे खूप आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये पर्यावरणाचा रहास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. झाडांची अक्षरशा कत्तल होत आहे यावर मानवाला गंभीर होणे आवश्यक आहे हे जर असेच चालत राहिले तर याहीपेक्षा भयानक असे संकट मानवावर ओढाऊ शकते.
संत तुकारामांनी तर चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी झाडांचे मानवी जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्या अभंगातून आपल्याला सांगितले आहे ते म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती”
त्यांच्या म्हणण्यानुसार झाडे ही माणसाला आपल्या सख्ख्या सोयऱ्याप्रमाणे आहेत. आपण आपल्या नातलगाला जसे जपतो त्यांची सेवा करतो. तसेच आपणही झाडाला जपले पाहिजे झाडे लावून त्यांना मोठे केले पाहिजे ही माणसाची पूर्णपणे जिम्मेदारी आहे. एवढ्या महाभयानक कोरोणाच्या संकटानंतर ही मानवाचे डोके ठिकाणावर येईल का नाही या संतांच्या शिकवणीचा काही उपयोग होईल का नाही हे काही सांगतायेणे कठीण आहे असे नमूद केले.

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये संतोष कंसमारे, नाजुकाबाई गौतम, निर्मल मेंढे प्रवीण सोनटक्के, कैलास भिलावे पुष्पराज पंधरे, निर्मला शिवणकर ग्रामपंचायत सदस्य शिवणकर जी ग्रामसेवक, प्रभाताई मेहर, अनिल भेलावे ,सादिक पठाण, जयेंद्र खडशिंगे ,पूरनलाल उईके, महेश हत्तीमारे, सुनील भेलावे दलित पवार, दीपक शेंडे, नंदकिशोर शेंडे सर, दीपक लांजेवार सर, कु. वर्षा वालदे मॅडम, तुषार कोवले सर भागन भाई मरस्कोल्हे, मीनाताई अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share