उद्या लागणार दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता होणार जाहीर

मुंबई,दि.15- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालांविषयी अंदाज वर्तवले जात होते. दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share