सर्व नगरपंचायतनी वनजमीन अतिक्रमण धारकांना त्वरित जमिनीचे पट्टे देण्याची कारवाई करावी

आमदार कोरोटे यांनी गोंदिया येथे आयोजित बैठकीत दिले सर्व अधिकारी यांना सूचना व निर्देश

गोंदिया/देवरी ता.१४: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील नगरपंचायतिंनी वनजमीनीवर बसलेले अतिक्रमण धारकांना वनहक्क कायद्या अंतर्गत नियमात बसवून आणि त्यांच्या जमिनीचे मोजमाप करुण सर्व अतिक्रमण धारकांना त्वरित जमिनीचे मोजमाप करुण सर्व अतिक्रमण धारकांना त्वरित जमिनीचे पट्टे देण्याची कारवाई सर्व मुख्यधिकारी यांनी करावी अशी सूचना आमदार सहषराम कोरोटे यांनी गोंदिया येथे जिल्हा कार्यालयात सोमवारी(ता.१२ जुलै) रोजी आयोजित आढावा बैठकीत दिले.
या आढावा बैठकीत वनजमीनीवर अतिक्रमण करुण बसलेले सर्व अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे, सर्वांना घरकुल योजनांचा लाभ. नवीन राशनकार्ड, शौचालयाचे थकित बिल, शबरी घरकुल, निराधार, वृद्धपकाळ, श्रावणबाळ पेंशन योजना अशा अनेक विषयांवर चर्चा करुण देवरी, आमगांव व सालेकसा या तालुक्यातील लोकांना या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या करिता सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्याचे समस्या मार्गी लावण्याचे सूचना व निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिले.


या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजेश खवले, गोंदिया जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, उपजिल्हाधिकारी तथा देवरीचे उपविभागीय अधिकरी अनमोल सागर(I.A.S), देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, आमगांव चे तहसीलदार दयाराम भोयर, सालेकसा चे तहसीलदार श्री. सिरसाट ,देवरी नगर पंचायत चे मुख्यधिकारी अजय पाटनकर, आमगांव नगर पंचायत चे प्रशासक दयाराम भोयर व सालेकसा नगर पंचायतचे मुख्यधिकारी श्री. चौव्हान यांच्या सह इतर विभागातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share