मैत्रिणींसोबत दिशा परमारची बॅचलर पार्टी

बिग बॉस १४ फेम सिंगर राहुल वैद्य व त्याची गर्ल फ्रेंड दिशा परमार येत्या १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. राहुल आणि दिशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.

राहुल व दिशाची लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. संगीत सेरेमनीसाठी दोघं डान्सचा सराव करत आहेत. आता दिशाचे तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचे काही फोट समोर आले आहेत.

दिशा परमारने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलरेट पार्टी केली आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.

पार्टीसाठी खास सजावट केली असल्याचं फोटोत पाहायला मिळतंय. दिशाच्या मैत्रिणींनी तिला हे खास सरप्राइज दिलंय. तर दिशाने “आय लव्ह यू गर्ल्स’ असं कॅप्शन तिच्या पोस्टला दिलंय. तसंच राहुलने “माझी वधू” कॉमेंट करून सर्वांचे लक्ष वेधलं.

Print Friendly, PDF & Email
Share