निसर्गवेडा : छंद माझा वेगळा ,मोह माझा सुटेना – विवेक पटले , सहा. व्यवस्थापक कॅनरा बँक देवरी
शब्दांकन@डॉ. सुजित टेटे
देवरी 12 : गोंदिया जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. डोंगराळ , हिरवेगार , घनदाट जंगलासोबतच वन्यसंपत्तीने नटलेल्या देवरी तालुक्यात आपल्या महाविद्यालयीन जीवनात जीवशास्त्रात शिकलेल्या गोष्टींची प्रत्येक्षात अनुभव घेण्याची संधी देवरी येथील कॅनरा बँकेत कार्यरत सहाय्यक व्यवस्थापक विवेक पटले यांनी कृतीत अंगिकारले आहे .
प्रत्येक विकेंडला आपला आगळावेगळा छंद जोपासायला आणि कार्यालयीन कामकाजापासून दूर स्वतःला renew करायला आपला छंद जोपासताना विवेक पटले न चुकता प्राणी आणि पक्ष्यांच्या दुनियेत भटकत असतात. त्यांच्या भटकंतीची आणि त्यांच्या छंदांची प्रचिती त्यांनी कॅमेराबंद केलेल्या छायाचित्रातून येते.
जाणून घ्या देवरी तालुक्यातील अरण्यात दिसणाऱ्या पक्षांबद्दल :
वाइल्ड लाइफ आणि बर्ड फोटोग्राफी
छायाचित्रणामधील हौशी फोटोग्राफीसाठी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी हे एक आनंददायी आव्हान असते. प्राणिसंग्रहालय, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये हे अशा छायाचित्रणाचे वैशिष्टय़ असते. याशिवाय निसर्गाची, प्राणीजीवनाची जाण व अभ्यास असणे फार महत्त्वाचे ठरते. यात जोखीमेसोबत छायाचित्रकाराच्या वैयक्तिक खर्चाचे प्रमाण तितकेच मोठे असते. अलीकडे पर्यटन व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारला असल्याने वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा मोठा व्यवसाय झाला आहे. त्यामुळेच विशेषत: हौशी छायाचित्रकार मोठमोठाली प्रदर्शने भरवून किंवा अशा प्रकारची मोठमोठाली पोस्टर्स तयार करणाऱ्यांना आपले वाइल्ड लाइफ फोटो करार तत्त्वावर देऊन किंवा विकून मोठी आर्थिक कमाई करू शकतात.