जनता शिक्षक महासंघ गोंदियाच्या वतीने जिप हायस्कूल देवरी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण

देवरी 12: जुलै रोजी जनता शिक्षक महासंघाच्या वतीने देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या भव्य पटांगणामध्ये आंबा जांभूळ कडुलिंब आवळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाच्या प्रसंगी भाजप गोंदिया जिल्ह्याचे महामंत्री वीरेंद्रजी अंजनकर सर, छत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक झामसिंगजी येरणे, देवरी नगरपंचायतचे माजी सदस्य यादवजी पंचमवार जनता शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्‍मण आंधळे प्रसिद्धीप्रमुख शिवाजीराव बडे देवरी तालुका अध्यक्ष दीपक कापसे उपस्थित होते. कोरोना महामारीचे संकट आलेले आहे या महामारी मुळे संपूर्ण मानव जात संकटात सापडलेली आहे. चीनने पसरवलेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण मानव जातीला अक्षरशः वेठीस धरले आहे दोन वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. कोरोना कधी संपेल व बंदिस्त झालेले मानवी जीवन कधी मोकळे होईल हे आज तरी निश्चित सांगणे कठीण आहे.

या महामारी मध्ये माणसाकडे असलेले धनसंपत्ती नातीगोती काहीही कामाला आले नाही. अक्षरशः लाखो लोकांचा बळी या महामारी मुळे गेलेला आहे. हे संकट जरी मानवनिर्मित असले तरी यामधून माणसाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. या संकटा मागे दुसरे तिसरे काही कारण नसून माणसाचा स्वार्थ पूर्णपणे दडलेला आहे.

आज आपल्या सर्वांना माहीत आहेकी अक्षरशः एका ऑक्सिजनच्या सिलेंडर साठी हजारो रुपये मोजावे लागले आहेत. जी झाडे आपणास जन्मापासून मृत्यूपर्यंत अगदी फुकट मध्ये ऑक्सिजन देतात फळे फुले देतात सावली देतात माणूस सगळे हे झाडांचे उपकार विसरलेला आहे. त्यामुळे सर्व जगभर भारतामध्ये झाडांची अमानुषपणे कत्तल केली जात आहे. जेव्हा लाखो रुपये घेऊन जीव वाचवण्यासाठी माणूस कुणी हवा देता का हवा असे म्हणून फिरू रडू लखला परंतु त्याला ऑक्सीजन भेटला नाही त्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. त्याने फुकटमध्ये ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची किंमत ओळखली नाही. तो हे विसरला की झाडा मुळेच आपले जीवन आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला अक्षरशः ओरबाडण्याचे काम केलेले आहे. त्याची किंमत माणूस आज मोजत आहे. असेच जर भविष्यामध्ये ही होत राहिली तर पृथ्वीचा विनाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणून मानवाने आता सावध होण्याची वेळ आलेली आहे.
यावेळी श्री वीरेंद्रजी अंजनकर सरांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाची स्तुती करत भविष्यामध्ये अशा समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आपण स्वतः सहयोग करणार असल्याचे सांगितले. तसेच मानवी जीवन टिकवायचे असेल तर झाडे लावणे व ती काळजीपूर्वक जगवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या संबोधनात म्हटले झाडे लावणे खूप आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये पर्यावरणाचा रहास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. झाडांची अक्षरशा कत्तल होत आहे यावर मानवाला गंभीर होणे आवश्यक आहे हे जर असेच चालत राहिले तर याहीपेक्षा भयानक असे संकट मानवावर ओढाऊ शकते.
संत तुकारामांनी तर चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी झाडांचे मानवी जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्या अभंगातून आपल्याला सांगितले आहे ते म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती”
त्यांच्या म्हणण्यानुसार झाडे ही माणसाला आपल्या सख्ख्या सोयऱ्याप्रमाणे आहेत. आपण आपल्या नातलगाला जसे जपतो त्यांची सेवा करतो. तसेच आपणही झाडाला जपले पाहिजे झाडे लावून त्यांना मोठे केले पाहिजे ही माणसाची पूर्णपणे जिम्मेदारी आहे. एवढ्या महाभयानक कोरोणाच्या संकटानंतर ही मानवाचे डोके ठिकाणावर येईल का नाही या संतांच्या शिकवणीचा काही उपयोग होईल का नाही हे काही सांगतायेणे कठीण आहे असे नमूद केले.


या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मंगलमूर्ती सयाम सर लोकनाथ तीतराम कश्यप सर तेजराम नंदेश्वर अमोल खंडाईत, शरद बोंद्रे प्रकाश घुगे नंदू भोयर शहारे सर सचिन सांगळे रवी जाधव मिथुन चव्हाण आशिष चवरे विष्णू टेकाळे मुंडे सर सिद्धेश्वर केंद्रे कैलास आव्हाड माधव बडे नजन सर नागरगोजे सर सोनटक्के सर वलके सर नागरे सर तसेच कु. जानवे खोटेले व शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी इत्यादींनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

Share