शिव संपर्क मोहिम उत्साहात साजरी

चिचगड 12 :शिव संपर्क मोहीम माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांच्या आदेशाने दिनांक 12 जुलै ते 22 जुलै पर्यंत शिव संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे त्याच मोहिमेत ची सुरुवात चिचगड बिरसामुंडा भवन येथून करण्यात आली . दिनांक 12 सोमवारला चिचगड येथे कार्यक्रम घेण्यात आले . या कार्यक्रमात विशेष उपस्थिती जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी नायडू व जिल्हा उपप्रमुख , सोहनजी क्षीरसागर व विधानसभा संघटक प्रमुख राजीक खान व देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा तसेच देवरी सहप्रमुख राजा भाटिया व जिल्हा संघटिका सौ करुणाताई कुर्वे तसेच दीनदयाल मेश्राम मेहुल गोसावी प्रीती उईके तालुका संघटिका आणि ऊ प संघटिका प्रीती नेताम मन्सूर बंदेअली यशवंत खोब्रागडे या कार्यक्रमामध्ये 50 पेक्षा अधिक युवकांनी आणि स्त्रियांनी शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून त्यांना प्रवेश देण्यात आले या कार्यक्रमामध्ये आता काही महिन्यात येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या निवडणुका येणार आहेत म्हणून ह्या कार्यक्रमात चिचगड जिल्हा परिषद मधून उमेदवार राजीक खान यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली तसेच चिचगड पंचायत समिती श्री राजकिरणजी मडावी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली तसेच पालांदूर पंचायत समिती सौ पूजा गुरनुले यांना उमेदवारी देण्यात आली अशी घोषणा कार्यक्रमात जिल्ह्यातील आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Print Friendly, PDF & Email
Share