नगरपंचायत देवरीच्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण, जबाबदार कोण ? जनसामान्यांना असह्य त्रास..

डॉ. सुजित टेटे |प्रहार टाईम्स

देवरी 10: सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक आणि विविध गोष्टींमध्ये देवरी ची ओळख आहे. मागील काही वर्षात देवरीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला असून देवरीचा मागील 4-5 वर्षात चांगलाच विकास झालेला दिसतो. परंतु या विकास कामांकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र रोजच बघावयास मिळत आहे.

रस्त्यांचे रुंदीकरण , वृक्षारोपण , नाल्यांचे काम , नवीन रस्ते , पथदिवे , थंड पिण्याचे पाणी , बगीचे, फवारे आणि विविध सुशोभीकरणाच्या गोष्टीवर कोट्यावधी खर्च करून विकास कामे करण्यात आलेली आहेत. हे सर्व विकास कामे बघून देवरी नगरपंचायतीचा इतर नगरपंचायतींना हेवा वाटायचा हे खरे. रस्त्याचे रुंदीकरण, वृक्षारोपण आणि इतर कामामुळे नागरिकांना आनंद वाटायचा परंतु आता जुने चित्र बघावयास मिळत नसून दुकांने रस्त्यावर आली आणि जनसामान्यांना येजा करायला कमालीची कसरत करावयास मिळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

रस्त्याच्या लगत नाल्यांचे झाकण उघडे पडलेले असल्यामुळे अपघातांना आमंत्रण असून अपघात झाल्यावर नाल्या झाकणार का ? खरंच प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची पर्वा आहे का ? जनतेचा सवाल उपस्थित होतो.

रस्त्यांची अवस्था खराब :

तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांना बुजविणे आवश्यक आहे, दुर्लक्षामुळे अपघात आणि जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

नाल्या साफ केल्या परंतु नाल्यावरील झाकण उघडेच:

स्वच्छता कर्मचारी नाल्या साफ करतात परंतु त्यांच्यावर कुठलाही अधिकारी निरीक्षण करीत नसल्यामुळे झाकण बाजूला पडलेले , नालीत गेलेले बघावयास मिळत आहेत , चारचाकी वाहनांचे रोजच नुकसान बघावयास मिळत आहे , या घटनांना जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होतो.

कचऱ्यामुळे खेडाळु त्रस्त :

ग्रामीण भागातील खेडाळु शहराबाहेरील खुल्या पटांगणावर क्रिकेट आणि खेळ खेळत असतात परंतु अनियंत्रित कचरा विल्हेवाट असल्यामुळे पटांगणात कचरा उडत येत असल्याने क्रीडाप्रेमींत नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे.

पावसाळा सुरु झालेला असून नाल्या पाण्याने भरून वाहणार हे निश्चित आहे. नगरपंचायत प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या हितासाठी कामाचे मॉनिटरिंग करून जनहितार्थी काम करावे अशी मागणी त्रास सहन करून सहनशील झालेल्यानागरिकांनी केली आहे .

Print Friendly, PDF & Email
Share