….यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. याच मुद्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तारुढ पक्षातर्फे एकतर्फी कारभार चालवण्यात आला. सत्तारुढ पक्षाने अतिशय कपोलकल्पित आरोप लावून आमच्या 12 आमदारांना एक वर्षाकरिता निलंबित केलं. यावरुनच सत्तारुढ पक्षाची मानसिकता काय आहे, याचं दर्शन होतं.मुळातंच ओबीसी प्रश्नावर सत्तारुढ पार्टी उघडी पडली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन आम्ही राज्य सरकारला उघडं पाडलं. यामुळे आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email
Share