लेख: गड-किल्ले संवर्धन

महाराष्ट्रातील गड आणि किल्ले यांकडे खरंच महाराष्ट्र सरकार तसेच नागरिक यांचे दुर्लक्ष होत आहे का…? माझ्या मते हो.

महाराष्ट्र हे एक असे राष्ट्र आहे की ते भारताच्या इतिहासात त्याची नोंद झाली आहेत तसेच संपूर्ण जगात त्याचे नावलौकिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच फक्त महाराष्ट्र आणि त्याचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठमोळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. महाराष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र. ज्या राज्यात मराठी लोक वास्तव्यास आहेत आणि येते मराठी संस्कृती जोपासली जाते असे हे महाराष्ट्र.

या महाराष्ट्रात खूप पर्यटन स्थळे आहेत, प्रेक्षणीय स्थळे आहेत, मनोरंजन ठिकाणे आहेत. पण या महाराष्ट्रात सर्वात महत्वाचे म्हणजेच गड किल्ले आहेत जे सुमारे 300 वर्षा पूर्वी पासूनचे ऐतिहासिक वास्तू म्हणून संबोधिली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. हे नाव जरी घेतले ना तरी अंगावर शहारा निर्माण होतो, शरीरात एक ऊर्जा निर्माण होते, एक जागृत शक्ती मनात संचारते. याच कारण एकच आहे ते म्हणजेचं या महाराष्ट्राचे आपण सर्व परिवार आहोत आणि आपले दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव आपल्या महाराष्ट्राला लाभले.

आपणा सर्वांनाच माहिती असेल की महाराजांनी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. अनेक गड जिंकले तसेच महाराष्ट्रातील अनेक किल्ले काबीज केले जे या आधी मुघलांच्या ताब्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यासह अनेक लढाया जिंकून महाराष्ट्राला गड आणि किल्ले मिळवून दिले. अशा शूरवीर थोर महामानवाला खरंच लाख लाख मानाचा मुजरा.

आपल्या सर्वांनाच एक अभिमान असला पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो कारण येथेच या महामानवाचे वास्तव होते. त्यांचे चरणस्पर्श असलेल्या पवित्र जागा, गड, किल्ले, तोफा, शस्त्र आजही महाराष्ट्रात आहेत. 300 वर्ष ओलांडली तरीही अजून हे गड, किल्ले आणि पुरातन गोष्टी काही प्रमाणत जशास तसें दिसत आहेत. 300 वेळा ऊन, पाऊस आणि थंडी या तीनही ऋतूंचा सामना तसेच वादळ आणि वारा यांच्याशी लढा या गड आणि किल्ल्यांनी केला आहे. काही प्रमाणत काही गड आणि किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे याचे मुख्य कारण म्हणजेच सरकार तसेच नागरिक यांचे त्यांजवळचे दुर्लक्ष.

आजही तुम्ही कोणत्याही गडावर किंवा किल्ल्यावर जा तुम्हाला 100% इतिहासाची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही कारण. या ऐतिहासिक वास्तू आजपण आपल्याशी संवाद साधू इच्छितात आणि आपल्याला 300 वर्षा पूर्वीच्या इतिहासाची जाणीव करून देतात. गड आणि किल्ले यांची रचना पहा, त्यांची कला, कृती पहा. सर्व गड आणि किल्ले हे पुरातन काळातील मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेले आहेत. प्रत्येक गोष्ट जर आपण बारकाईने पहिली तर त्याचं आपल्याला खूप अभ्यास नक्कीच करता येईल. हा एक दगड एवढा मोठा आहे की तो आपल्या 30 माणसांना उचलायला सांगितला तरीही नाही उचलणार. त्याकाळी कोणताही व्यक्ती इंजिनीअर वैगरे नव्हता, कोणताही व्यक्ती फाईन आर्टिस्ट नव्हता तरीही देखिल एवढे सुरेख गड आणि किल्ले कसे काय बांधले यावर एक प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित राहील कारण या सर्व गोष्टी एवढ्या सुरेख आहेत की आजच्या काळातही त्या पुन्हा करणे किंवा त्या गोष्टींचा पुनर्विचार करणे फारचं अवघड आहे.

जर आपल्याला महाराष्ट्राला अशी ऐतिहासिक संपत्ती मिळत असेल तर त्या संपत्तीचा आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. गड आणि किल्ले यांचे सुशोभीकरण तसेच डागडुजीचे काम महाराष्ट्र सरकारने केले पाहिजेत. सरकार हे दर 5 वर्षांनी बदलते पण मुख्यमंत्री हा एक मराठी आणि महाराष्ट्राचाच असतो. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असूद्यात, कोणीही असूद्यात तुम्ही महाराष्ट्रात राहता तर महाराष्ट्र संस्कृती जोपासा आणि महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वस्तूंची काळजी घ्यायला हवी. कारण महाराष्ट्र राज्याची खरी संस्कृती म्हणजेच महाराष्ट्राचे गड आणि किल्ले आहेत.

महाराष्ट्र सरकार सोबतच आपण महाराष्ट्राचे नागरिक सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोठेतरी जबाबदार आहोत. आपण आपल्या मित्रांसोबत मॅकडोनल्डचा बर्गर खायला जाऊ शकतो, आपण आपल्या मुलांसोबत वॉटर पार्क मध्ये जाऊ शकतो, आपण आपल्या आई वडिलांसोबत देवस्थान पाहायला जाऊ शकतो पण आपण गड आणि किल्ले पाहायला नाही जाऊ शकत कारण तेव्हा आपल्याला वेळ उरत नाही. वेळ ही कधीच न थांबणारी गोष्ट आहे. ती सतत धावतच असते आणि आपल्यालासुद्धा या वेळे नुसार धावायचे असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येतं नसते. आपण जर तरुण वर्गाला तसेच लहान मुलांना आतापासूनच इतिहासाची माहिती करून दिली आणि गड व किल्ले पाहावयांस नेले तर नक्कीच त्यांच्या मानत सुद्धा एक नवीन आदर्श निर्माण होईल आणि आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढेल. यामुळे लहांना पासून थोर व्यक्तींपर्यंत सर्वच जण जेव्हा एकत्र येतील तेव्हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा भगवा झेंडा उंच टोकावर पुन्हा एकदा अभिमानाने फडकू लागेल आणि इतिहासाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळेल.

©️ कॉपीराइट्स
नाव: भूषण सहदेव तांबे,
पत्ता: बदलापूर, जिल्हा ठाणे.
संपर्क: ९०२९२५८०३८
ई-मेल: [email protected]

Share