मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे संविधान दिन साजरा
देवरी: येथील मनोहरभाई पटेल हायस्कूल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी.एम.मेश्राम, विशेष अतिथी म्हणून मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.टी.हलमारे, पर्यवेक्षक डी.एच. ढवळे, शाळा उपप्रमुख राजू कारेमोरे, एस.पी.देशमुख, वाय.ड्ब्लू.फेंडर, बी.एस.चाकाटे,कु.आर.एस.पाहुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी समस्त मान्यवरांनी भारतीय संविधानाची नियमावली प्रत्येक मानवाने अंगिकारावी,
संविधान हा आम्हा भारतीयांचा प्राण आहे, त्यात असलेल्या चाकोरीत राहून जीवन जगावे,असे विचार मांडले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी झंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही.जी.नागदेवे यांनी मानले,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो प्रमुख जगदीश खेडकर व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.