नक्षलवादयांनी पुरुन ठेवलेली रोख रक्कम व स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

गडचिरोली: जिल्हयामध्ये नक्षल नेहमी गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी राबविले जाणारे बांधकाम , रोजगार , यामधुन तेंदुपता ठेकेदार , सामान्य नागरिक यांच्याकडुन मोठया प्रमाणात खंडणी वसुल करुन ती रक्कम देश विघातक कृत्यासाठी वापरतात . तसेच जिल्हयात हिंसक कारवाया करण्यासाठी लागणारे शस्त्र साहित्य , दारुगोळा इत्यादी खरेदी करण्यासाठी वापरतात . या कामाकरीता जमा करण्यात आलेला सर्व पैसा व शस्त्र साहित्य , दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या ठेवतात . त्याकरीता गडचिरोली जिल्हयाचे मा . पोलीस अधीक्षक श्री . अंकित गोयल सा . , मा . अपर पोलीस अधीक्षक ( अभियान ) श्री . मनिष कलवानिया सा . , मा . अपर पोलीस अधीक्षक ( प्रशासन ) , श्री समीर शेख सा . , मा , अपर पोलीस अधीक्षक श्री . सोमय मुंडे सा . अहेरी , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी अभियान श्री . भाऊसाहेब ढोले सा . यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात असतो . दिनांक ०१/०७/२०२१ रोजी एका मोठया नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन सी -६० व इतर अभियान पथकाचे जवान मिळुन पोमके हालेवारा हद्दीमध्ये पोस्टे एटापल्ली अंतर्गत असलेल्या कुदरी जंगल परिसरात खुप मोठी जोखीम घेवुन नक्षलविरोधी अभियान राबविले . यामध्ये त्यांना खुप मोठे यश आले आहे . यामध्ये त्यांना १५ लाख ९ ६ हजार रु . रोख रक्कम , इलेक्ट्रीक बटन ४ नग , स्वीच १ नग , डेटोनेटर ३ नग , वायर बंडल २ नग , वाकी टाकी १ नग , नक्षल पॉम्पलेट , बॅनर , पिट्ठ व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे . सदर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे . या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे . त्यामुळे नक्षल्यांचे लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन , सामान्य नागरीकांकडुन खंडणी वसुल करणे नक्षलवादयांना आता अडचणीचे ठरणार आहे . सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सां . यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे.

Share