घरातचं लावली गांजाची झाडे… पोलिसांनी केली अटक!

लाखनी 01- माणसाला व्यसन कुठे घेऊन जाईल याचा काही नेम नाही. आपल्या व्यसनाच्या मोहापायी स्वतःच्या घरातच अवैधरित्या गांज्याची झाडांची लागवड करणे भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील परसोडी-पवार गावातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. लाखनी पोलिसांनी आरोपी घरमालकास अटक केली आहे.

व्यसनाच्या मोहापायी स्वतःच्या घरातच अवैधरित्या गांज्याची झाडांची लागवड करणे भंडारा जिल्ह्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

युक्तेश्वर आत्माराम सूर्यवंशी (वय 68) वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरातून 5 ते 7 फुटाची 6 गांजाची झाडे व एकूण 6 किलो 284 ग्रॅम वजनाची पाने असा 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घराची अधिक तपासणी केली असता एका खोलीत गांजाची पाने (एकूण वजन 6 किलो 284 ग्रॅम) आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी युक्तेश्वर आत्माराम सूर्यवंशी याच्या विरुद्ध कलम 20 NDPS ACT 1985 नुसार गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास लाखनी पोलिस करत आहेत.

Share