मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

गोंदिया- भारत निवडणूक आयोगाचे 24 ऑगस्ट 2020 चे पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित झाले असून १५ जानेवारी २०२१ रोजी गोंदिया जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी ६३-अर्जुनी मोरगाव, ६४-तिरोडा, ६५-गोंदिया व ६६-आमगाव विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
१५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादी प्रमाणे आज रोजी गोंदिया जिल्ह्यात एकूण १७,१९१ छायाचित्र नसलेले मतदार असून ६३-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघामधील छायाचित्र नसलेले मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम १00 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीतील सर्व नावासमोर संबंधीत मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य असल्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार सदर छायाचित्र नसलेले मतदारांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मार्फत गोळा करुन मतदार यादीत अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. ६४-तिरोडा (१६७२), ६५-गोंदिया (१४,९४६), ६६-आमगाव (५७३) असे एकूण १७,१९१ मतदार आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या विधानसभा मतदार संघ अंतर्गत असलेल्या मतदार यादीची तपासणी करुन आपले नावासोबत छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी.
मतदार यादीत नावासोबत छायाचित्र नसल्यास तात्काळ संबंधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात ५ जुलै २0२१ पयर्ंत सादर करावे, अन्यथा अश्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.

Share