सरपंच सेवा महासंघाची 1 जुलैला सभा- कमल येरणे
प्रहार टाईम्स
गोंदिया 28- सरपंच सेवा महासंघ गोंदिया द्वारे 1जुलै 2021 रोज गुरुवारला जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांनी सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हास्तरीय सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष कमल येरणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सदर सभेचे आयोजन पंचायत समिती सभागृह गोरेगाव येथे करण्यात आलेले असून कोविड नियमावलीनुसार नियम पाळून सभा पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
सदर सभेमध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणी गाथिल करून अध्यक्षाची निवड करणे,सर्व तालुका कार्यकारणीचे पुंनर्गठण करणे , स्ट्रीट लाइट विधयुत कनेक्शन कापल्याबाबत सविस्तर चर्चा करणे आणि अध्यक्षाच्या वतीने वेळेवर येणार्या विषयावर चर्चा करणे आदि विषयाला घेवून सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे .