तंटामुक्त समितीने लावले प्रेमी युगलांचे आंतरजातीय लग्न

चिचगड- 27: चिचगड पासून 2 किलोमीटर अंतरावर वांढरा ग्रामपंचायत अंतर्गत रविवारला तंटामुक्त समितीने दोन मुला मुलींचे आंतरजातीय लग्न लावून दिले असून मुलीचे नाव सुलभा तुळशीदास वालदे राहणार रेहडी तर मुलगा प्रकाश रोशन गिरी राहणार ककोडी या दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण दोघांची जात वेगळी असल्यामुळे सुरुवातीला दोन्ही पक्षाकडून विरोध होता पण गावात असलेल्या तंटामुक्ती समितीने दोघांच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना समजावून त्या दोघांचे वांढरा ग्रामपंचायत परिसरामध्ये लग्न लावून दिले.

यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री भोजसिंग कच्छप, सचिव अशोक , शहारे पोलीस पाटील वाढंरा ,सदस्य मोतीलालजी पीहिदे ,इंदल अरकरा ,महादेवजी श्यामकुवर,
भिवाजी भोयर ,तानबाजी नाटके ,ललित भैसारे ,साईन सैय्यद रिंकेश कटकवार आणि गावकरी ह्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते .

यावेळी ग्रामपंचायत वाढंरा आणि तंटामुक्ती समितीने दोन्ही नवदाम्पत्याला जीवनोपयोगी भेटवस्तू देऊन त्यांची रवानगी केली ह्यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी मुला मुलींना भेट म्हणून दोन हजार चाळीस रुपये दिले.

Print Friendly, PDF & Email
Share