दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क भात शेतीला ठरेल वरदान- जि.जी. तोडसाम

देवरी 18- पर्यावरणाचा समतोल व शत्रूकिडीवर जैविक पद्धतीने मात करण्यासाठी निंबोळी अर्क हे भातशेतीला वरदान ठरेल असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषि अधिकारी श्री. जि.जी. तोडसाम यांनी केले आहे.देवरी येथे नुकतेच शेतकरी प्रशिक्षणामध्ये बोलत होते.

रासायनिक खते, कीडनाशके यांचा भरमसाठ वापर करून भातशेतीची उत्पादन खर्च तर वाढतच आहे.परंतु पर्यावरनात माती प्रदूषित होऊन मित्रकिडी, उपयुक्त जीवाणू, एकुण एक जीव श्रुष्टी धोक्यातआलेली आहे. म्हणून विषमुक्तअन्न निर्मिती करून मानवी जीवन अधिक आरोग्यदायी बनवणे हि काळाची गरज बनलेली आहे. रासायनिक कीटकनाशके वापरल्याने शत्रूकिडीची प्रतिकार शक्ती वाढलेली असुन ते कीडनाशकाना दाद देत नाहीत, म्हणून आपल्या परिसरातील, शेतकऱ्याच्या बांधावर वाढणाऱ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या असंख्यवनस्पती आहेत. ज्या वनस्पती शेळी व इतर जनावरे खत नाहीत, अश्या वनस्पती मधील कोणत्याही दहा वनस्पतीची पाने दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी गोळा करायवयाचे आहेत. यात कडूनिंब ५ किलो, करंज २ किलो, रुच्कीन २ किलो, एरंडी २ किलो, कणेर २ किलो, घराडी २ किलो, पपई २ किलो, कणेर २ किलो, गुळवेल२ किलो, गारवेल २ किलो, वरीलप्रमाणे वनस्पतीची पाने गोळा करून बारीक चुरा करावा. देशी गाईचे गोमुत्र ५ लिटर व देशी गाईचे शेण ५ किलो उपलब्ध करावे. वरील साहित्य २०० लि. पाण्याचे ड्रम मध्ये मिसळून घ्यावे नन्तर ते ३० दिवस सावलीमध्येआंम्बवावे. ड्रमचे तोंड बंध करून ठेवावे. दररोज २ ते ३ वेळा डावीकडून उजवीकडे काटीणे ढवळावे. ३० व्या दिवशी हे द्रावण वस्त्र गाळण करून घ्यावे. तयार झालेले द्रावण एक एकरासाठी २.५० लि. २०० लि. पाण्यामध्ये मिसळून भात पिकावर १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे शत्रूकिडीची अंडी, अळी, कोष, पतंग, या सर्व अवस्था नष्ठ होतात. अश्या प्रकारे शत्रुकीडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण होते. 

सदर प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याची कृती प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले, प्रशिक्षणामध्ये चिचगडचे मंडळ कृषि अधिकारी श्री. चंद्रकांत कोळी, देवरीचे मंडळ कृषि अधिकारी विकास कुंभारे, कृषि सहाय्यिका डी. एम. गौतम, कृषि सहाय्यिका माया येरणे यांनी प्रात्याक्षिक कृतीचे सादरीकरण केले. या प्रशिक्षणामध्ये शेतकरी बांधव, तालुक्यातील कृषि पर्यवेक्षक जी.एस.पांडे, फिरोज कापगते, शिवकुमार येडाम, मनोहर जमदाळ, कृषि सहाय्यक सलामे, सावलकर, पारधी, कोल्हे, धानगाये, हरदुले, कडव, गावळ, कोरे, हुळे, डोंगरवार, पाथोडे, कापगते, धानगाये व सखीमंच आणि मावीमचे महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन देवेंद्र पारधी यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर कोल्हे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share