कृषि संजिवनी सप्ताह स्वरूपामध्ये राबविणार – तोडसाम (तालुका कृषी अधिकारी)
प्रहार टाईम्स
देवरी 18: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकार्यापर्यंत पोहचवण्यासाठी देवरी तालुक्यात कृषि संजीवनी सप्ताह मोहीम साजरी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम गावोगावी मोहीम स्वरूपामध्ये राबविणार असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषि अधिकारी श्री. जि.जी. तोडसाम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्यारे केले आहे.
खरीप हंगामाची लगबग सुरु झालेली आहे. शेतकरी शेतीच्या कामामध्ये मग्न आहेत. शेताची बांधबंधीस्थि व पुर्वतयारी करताना खरीप हंगामापुर्वी पिकावर येणाऱ्या विविध कीड आणि रोगांचे प्रतिबंधक उपाय पुर्वमश्यागतीपासूनच करावे लागते. त्या पार्श्वंभूमीवर खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी दिनांक २१ जून ते ०१ जुलै २०२१ या कालावधीत कृषिसंजीवनी सप्ताह मोहीम साजरीकरण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, जि.प. कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कृषि तंत्रज्ञान मधील छोटीशी सुधारणा देखील पिक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. या अनुसंगाने विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, प्रात्याक्षिके सादरीकरण करण्यात येणार आहे .
हवामानातील फेरबदल, नैसर्गिक आपत्ती, कीड रोगांचे प्रादुर्भाव होवून हातातोंडाशी आलेले पिकाचे नुकसान होते. तसेच नियोजना अभावी धान शेतीच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणामामुळे उत्पादाकता कमी होवून शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत येतात. यामुळे कृषि संजीवनी सप्ताह हे तालुक्यातील 133 गावामध्ये कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचे पथक तयार करून या पथकाच्या माध्यमातून गावो गावी कृषि संजीवनी सप्ताह मोहीम साजरी करण्यात येणार असुन खरीप हंगाम २०२१ मध्ये खालील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
दिनांक-
२१/०६/२०२१
विषय- भात लागवड पट्टा पद्धत, नियंत्रित भात लागवड, ड्रम सीडरचा वापर करून भात पेरणी, गादी वाफ्यावर नर्सरी तयार करणे. चतुसुत्री, श्री पद्धती तंत्रज्ञान प्रचार व प्रसिद्धी करणे.
२२/०६/२०२१
बिज प्रक्रिया – ३% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे, अझोटोबक्टर, PSB जैविक संवर्धन प्रक्रिया करणे .
२३/०६/२०२१
जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर करून १०% खताचा वापर कमी करणे. हिरवळीचे खताचे महत्व समजावून सांगणे व ग्लीरीसीडीया ,युरिया ब्रिक्रेटचा वापर करणे.
२४/०६/२०२१
सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, एक गाव एक वाण ,श्री पद्धतीने लागवड ,पट्टा पद्धतीने लागवड करणे.
२५/०६/२०२१
विकेल ते पिकेल योजनेची प्रसिद्धी करणे, शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री व्यवस्था निर्माण करणे, बाळासाहेब ठाकरे अन्न प्रक्रिया योजना (SMART) मार्गदर्शन करणे.
२८/०६/२०२१
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड तंत्राचा वापर करून लागवड करणे.
२९/०६/२०२१
अधिक उत्पादन घेणाऱ्या रीसोर्श बँकेतील शेतकऱ्याचे मार्गदर्शन ,धान व तूर उत्पादक शेतकरी यांचे सहभाग वाढविणे.
३०/०६/२०२१
भात पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर, निबोळी अर्क, दशपर्णी अर्क, यांत्रिक पद्धत, फेरोमन ट्रप, प्रकाश सापळे, जैविक पद्धत, ट्रायकोग्रामा या मित्रकीटक कार्डचा वापर, मेट्याराय्झीम अनीसोपलीचा वापर करणे.
०१/०७/२०२१
१ जुलै कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन व कृषि संजीवनी कार्यक्रमाचे समारोपीय कार्यक्रम मा.उपविभागीय कृषि अधिकारी कार्यलय, देवरी येथे करण्याचे आयोजित आहे.
कृषि दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम तालुक्यातील गावामध्ये केलेल्या कामाचा उहापोह करणे.