शासकीय योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहता कामा नये

आमदार सहषराम कोरोटे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

देवरी १५: गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव हळूहळू आटोक्यात येत आहे. कोरोना च्या संचारबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्य गोर गरीब लोकांना खुप त्रास झाला. मात्र संचारबंदी हटविल्याने परिस्थिति सुधारत आहे. आता शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब सर्व सामान्य लोकांकरिता असलेल्या शासनाच्या सर्व शासकीय योजनेचा लाभ गरजु लोकांना मिळवून देण्याकरिता शासकीय यंत्रनेने प्रयत्न करने गरजेचे आहे, तरी अशा परिस्थितीत शासकीय योजनेच्या लाभापासुन कोणीही वंचित राहता कामा नये असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी दिले.

आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील पालान्दूर(जमी.) येथे शनिवार(ता. १२जून) रोजी आयोजित शेतकरी सभेच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते. या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदिप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शकील कुरैशी, धोनाडीचे सरपंच सोनू नेताम, पालान्दूर(जमी.) चे सरपंच जयवंताताई हरदुले, नुरचंद नाईक, नमन गुप्ता, यशवंत गुरनुले. विठोबा लेंढे, श्री. गांधी, दुलाराम उसेंडी, यांच्या सह परिसरातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ति समितीचे पदाधिकारि, ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी , शेतमजूर व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शेतकरी सभेत पालान्दूर(जमी.), मगरडोह, गरारटोला, बालापुर, चैंभुली, धोनाड़ी, सिंगणडोह व सुकड़ी या गावातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य लोक उपस्थित होते, सभेत प्रामुख्याने वन जामिनीचे पट्टे, वनजमीन अतिक्रमण व वन जमीन पट्टे धारक शेतकरी यांचे धानखरेदी, रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभ यात घरकुल, शौचालय योजनेचे देयक, शेतातिल विज कनेक्शन, मगरडोह(चुम्भली) येथे बँधाराचे व पुलाचे बांधकाम अशा वीवीध विषयावर चर्चा करुण या समस्येचे त्वरित निराकरण करण्या संबंधात आदिवासी विकास मंत्री के.सी.वाडवी, गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी भ्रमनध्वनिवर संपर्क करुण समस्या निराकरण करण्याचे सूचना दिले. तसेच सोबतच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता फुलसेल, अभियंता श्री कांबळे, गतविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांच्या सह इतर संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमनध्वनिवर संपर्क करुण गरजु लोकांच्या समस्या व योजनेच्या निराकरण करण्याचे दिशा निर्देष दिले.

Print Friendly, PDF & Email
Share